मेंदूचं आरोग्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी घरगुती उपाय |

मेंदूचं आरोग्य आणि स्मरणशक्ती उत्तम राहण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या शरीराचा सर्वांत महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू. तो विचार, समज, भावना आणि शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करतो. तणाव, चुकीचा आहार, अपुरी झोप यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते.सध्याच्या काळात धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण आदी गोष्टींमुळे लोकांना आरोग्य आणि आहाराकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. त्यामुळे साहजिकच लोकांचा कल फास्ट फूड, जंक फूडकडे असतो. मात्र या पदार्थांमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊन गंभीर आजाराचा धोका वाढतो. 

मेंदू आरोग्य-स्मरणशक्ती उपाय


मेंदू हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण मेंदूवर अवलंबून असतं. त्यामुळे मेंदूचं आरोग्य उत्तम राहणं गरजेचं असतं. येथे आपण पाहूया काही सोपे घरगुती उपाय जे मेंदूचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

१. योग्य आहार – मेंदूसाठी पोषक आहार

  • बदाम आणि अक्रोड: आरोग्यासाठी आपण ड्रायफ्रुट्स आवर्जून खातो. ड्रायफ्रुट्समध्ये हेल्दी फॅट आणि प्रोटिन मुबलक असतं. रोज बदाम आणि अक्रोड खाल्ल्यानं मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं. आक्रोड व बदाम रात्री भिजत ठेऊन सकाळी खाणे उत्तम. तसेच बदामाची साल काढून टाकणे या ड्रायफ्रूट्समध्ये ओमेगा-3 अ‍ॅसिड आणि अँटिऑक्सिडंट असतात. हे दोन्ही घटक मेंदूच्या आरोग्यासाठी पूरक मानले जातात. यातील ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स महत्त्वाची भूमिका निभावत असते.
  • हिरव्या भाज्या: लहानपणापासून आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या पालेभाज्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये केळी आणि पालकाची भाजी विशेष गुणकारी मानली जाते. या भाज्यांमध्ये फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन के, ल्युटिन आणि बीटा कॅरोटिन मुबलक प्रमाणात असते. या भाज्यांचे नियमित सेवन केल्यास आपली स्मरणशक्ती सुधारते तसेच मेंदूचे आरोग्य देखील उत्तम राहते. पालक, मेथी, चाकवत हे लोखंड व अँटिऑक्सिडंट्ससाठी फायदेशीर.
  • फळं:  मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी खालील फळं अत्यंत उपयुक्त ठरतात. ही फळं पोषक तत्त्वांनी भरलेली असून स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवतात:आवळा, सफरचंद, डाळिंब, केळी – मेंदूच्या पेशींसाठी लाभदायक.
मेंदू आरोग्य-स्मरणशक्ती उपाय-आयुर्वेदिक उपाय


२. आयुर्वेदिक उपाय

  • ब्रम्ही: स्मरणशक्ती वाढवते. दूधात ब्रम्ही पावडर मिसळून घ्या.
  • शंखपुष्पी: मेंदू शांत ठेवतो आणि कार्यक्षमता वाढवतो.
  • अश्वगंधा: तणाव कमी करून मेंदूला बळकटी देतो.
  • आवळा: अँटिऑक्सिडंट्सने भरपूर, मेंदूची वृद्धी कमी करतो.
  • ब्राह्मी व शंखपुष्पीचा उपयोग: हे आयुर्वेदिक औषध मेंदूचे कार्य सुधारते. लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती वाढवणे यासाठी फायदेशीर. रोज सकाळी ब्राह्मी शरबत किंवा शंखपुष्पी सिरप 1चमचा घ्या.
  • * ब्राह्मी सिरप/चूर्ण वापरण्याचा उपाय: 
  • साहित्य:
  • ब्राह्मी चूर्ण  ½ चमचा, मध 1 चमचा, कोमट दूध 1 कप.  
  • वापरण्याचा विधी: 
  • सकाळी उपाशीपोटी ब्राह्मी चूर्ण मधात मिसळून कोमट दूधासोबत घ्या.लक्ष, एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर आहे.

३. योग व प्राणायाम

    मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी          काही विशेष योगासने आणि प्राणायाम सुद्धा आहेत, जे दररोज 15      ते 30 मिनिटे केल्याने खूप चांगले परिणाम मिळू शकतात:
  • अनुलोम-विलोम: ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतो.
    शवासन (Shavasana): 
   *कसा करावा: पाठीवर झोपा, डोळे बंद करा, संपूर्ण शरीर शिथिल        करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा.
  * फायदे: मेंदूला विश्रांती मिळते , झोप आणि मानसिक शांतता               सुधारते.

* सर्वांगासन (Sarvangasana):
  *कसा करावा: पाठीवर झोपा, पाय वर उचला आणि पाठ सरळ ठेवून     शरीराला हातांनी आधार द्या. सुरुवातीला 2 ते 3 मिनिटे करावे व हळू     हळू रोज प्रमाण वाढवू शकता.
  * फायदे: मेंदूकडे रक्तप्रवाह वाढतो, स्मरणशक्ती आणि मेंदू                   कार्यक्षमता वाढते.

*हलासन (Halasana): 
  * कसा करावा: सर्वांगासन नंतर पाय डोक्यापलीकडे जमिनीला            टेकवा, हळूहळू श्वास घ्या आणि लक्ष केंद्रित ठेवा.
  * फायदे: मेंदू आणि मज्जासंस्थेवर सकारात्मक प्रभाव पडून एकाग्रता वाढवते. 

* पद्मासन व ध्यान (Meditation in Padmasana): 
* कसा करावा: पद्मासनात (कमलासनात) बसून डोळे बंद करा मन   शांत करा आणि श्वासावर लक्ष ठेवा.
* फायदे: मानसिक शांती, स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि निर्णयक्षमता वाढवते.

मेंदू आरोग्य-स्मरणशक्ती उपाय-आयुर्वेदिक उपाय


  • ब्राह्मरी: एकाग्रता व तणाव नियंत्रणात आणतो.
  • ध्यान: मानसिक स्थैर्य निर्माण करतो.
   टीप: ही सर्व योगासने आणि प्राणायाम रिकाम्या पोटी सकाळी करणे     उत्तम. योग्य मार्गदर्शनाखाली योग शिकणे अधिक सुरक्षित आणि         फायदेशीर ठरते.

४. झोपेची काळजी

दररोज ७-८ तास झोप आवश्यक आहे. रात्री लवकर झोपा, मोबाईलचा वापर कमी करा.

५. तणाव कमी करण्याचे उपाय

  • दैनिक कामांचं योग्य नियोजन करा.
  • सकारात्मक विचार ठेवा.
  • छंदांसाठी वेळ राखून ठेवा.

६. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खास उपाय

  • भिजवलेले बदाम: रोज ५ बदाम खा.
  • त्रिफळा चूर्ण: रात्री गरम पाण्यासोबत घ्या.
  • तुळशीची पाने: दररोज सकाळी उपाशीपोटी खा.

७. मेंदू सक्रिय ठेवणाऱ्या सवयी

वाचन करा, कोडी सोडवा, नवीन गोष्टी शिकत राहा. स्क्रीन टाइम कमी ठेवा.

८. सुगंध थेरपी

लवंग, वेलदोडा, लवेंडर या सुवासिक पदार्थांचा उपयोग करा. ध्यान करताना अरोमा थेरपीचा वापर करा.

मेंदू आरोग्य-स्मरणशक्ती उपाय-आयुर्वेदिक उपाय


निष्कर्ष

मेंदूचं आरोग्य योग्य आहार, योग, आणि आयुर्वेदिक उपायांनी सहज राखता येऊ शकतं. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करा आणि तणावमुक्त, सशक्त जीवन जगा.

Health Mantraa India सोबत नैसर्गिक मार्गाने तंदुरुस्त राहा!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thank you to visit Healthmantra blog