पक्षाघात (Paralysis disease) आजाराची माहिती!


पक्षाघात हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये शरीराच्या एका भागाचे कार्य अचानक बंद होते. मेंदूतील किंवा मज्जासंस्थेतील समस्या यामुळे शरीराचा काही भाग हालचाल करू शकत नाही किंवा संवेदना गमावतो. तरीसुद्धा पक्षाघात हा गंभीर आजार असला तरी तत्काळ उपचार, संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि फिजिओथेरपीच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवता येते आज आपण पक्षाघात (Paralysis disease) आजाराची माहिती घेणार आहोत.

पक्षाघात (Paralysis disease) आजाराची माहिती!

पक्षाघात (Paralysis disease) आजाराची माहिती! 

मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. याठिकाणी पक्षाघात म्हणजे काय, पक्षाघाताची कारणे, पक्षाघात का व कशामुळे होतो, पक्षाघात लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती ह्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.


पक्षाघात म्हणजे काय?

मेंदूतील रक्तपुरवठा अडकल्याने किंवा मेंदूच्या पेशी नष्ट झाल्याने शरीराचा काही भाग हालचाल करू शकत नाही. पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो आणि डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो व शरीर लुळे पडते. हा त्रास तोंड, हात, पाय किंवा संपूर्ण शरीरावर होऊ शकतो याला स्ट्रोक (Stroke) किंवा अर्धांगवायू (Hemiplegia) देखील म्हणतात.


पक्षाघात होण्याची कारणे: 

पक्षाघात होण्याची मुख्य चार कारणे खालीलप्रमाणे आहेत:  


1) इस्केमिक स्ट्रोक (Ischemic Stroke): 

मेंदूमध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक झाल्यास मेंदूला रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही. ही सर्वात सामान्य कारणे आहेत आणि ८५% लोकांमध्ये ही समस्या आढळते.उदाहरण, रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, मधुमेह इत्यादी.


2) ट्रॉमॅटिक किंवा स्पायनल कॉर्ड इंज्युरी (Traumatic Paralysis): 

अपघात किंवा दुखापतीमुळे मेंदू किंवा मज्जारज्जू (Spinal Cord) वर परिणाम झाल्यास शरीराचा काही भाग लुळा पडतो.  


3) हॅमरेजिक स्ट्रोक (Hemorrhagic Stroke):  

मेंदूमधील एखादी नस फुटल्याने रक्तस्त्राव होतो आणि पक्षाघात होतो. याचे मुख्य कारण म्हणजे अतिउच्च रक्तदाब आणि मेंदूतील रक्तवाहिन्यांचा कमकुवतपणा.  


4) ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक (TIA): मिनी स्ट्रोक  

हा लघु पक्षाघात असतो जो काही मिनिटे किंवा तासभर टिकतो आणि नंतर सुधारतो. ही एक गंभीर इशारावजा स्थिती असते, जी भविष्यात मोठ्या स्ट्रोकची शक्यता वाढवू शकते.

पक्षाघात (Paralysis disease) आजाराची माहिती!


पक्षाघाताची लक्षणे: 

मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते. पक्षाघाताची लक्षणे अचानक दिसू शकतात आणि त्या व्यक्तीस तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असते.

*  एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.

* हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.

* तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.

* अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

*  ‎एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.

*  ‎चक्कर येणे, तोल जाणे,

* चेतना कमी होणे

* तीव्र डोकेदूखी

* तोंडाचा एक भाग वाकणे

* एका हात किंवा पायाची हालचाल थांबणे

* बोलताना तोंडातून शब्द स्पष्ट निघत नाहीत (अवघड बोलणे)

* डोकेदुखी आणि चक्कर येणे

* दृष्टी कमी होणे किंवा एकाचवेळी दोन प्रतिमा दिसणे गोंधळ किंवा भ्रमिष्ट होणे इत्यादी. 


पक्षाघाताचा झटका आल्यानंतरची पहिले 3 तास हे Golden Period असतात ह्या काळामध्ये रुग्णावर उपचार केल्यास रुग्ण लवकरात लवकर बरा होतो तसेच पक्षाघाताच्या झटक्यामुळे मेंदूमध्ये होणारा बिघाड थांबवता येऊ शकतो. रुग्णास वेळीच उपचार मिळाल्यास पुढील मोठा धोका टळू शकतो.


 पक्षाघाताची FAST टेस्ट: लक्षणे ओळखण्याची सोपी पद्धत: 

* F : Face Drooping चेहऱ्याचा एक भाग वाकतो का?  

* A:  Arm Weakness हात उचलता येतो का?  

* S:   Speech Difficulty बोलताना त्रास होतो का?  

* T:  Time to Call Emergency त्वरित डॉक्टरांना संपर्क करा!  

पक्षाघात (Paralysis disease) आजाराची माहिती!


-पक्षाघाताचे प्रकार

1)  संपूर्ण पक्षाघात (Complete Paralysis): यामध्ये संपूर्ण शरीराचा काही भाग हालचाल करू शकत नाही. अर्धांगवायू (Hemiplegia):  शरीराचा डावा किंवा उजवा भाग लुळा पडतो.


2) अंशतः पक्षाघात (Partial Paralysis): शरीराचा काही भाग हलकासा लुळा पडतो, पण तो हलू शकतो.

मायस्थेनिया ग्रेव्हिस (Myasthenia Gravis) किंवा मल्टीपल स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) यामुळे होतो.


3) तात्पुरता पक्षाघात (Temporary Paralysis): काही वेळानंतर सुधारणा होते, पण उपचार त्वरित आवश्यक असतात.  


4) जन्मजात पक्षाघात (Congenital Paralysis)  

जन्मत:च मेंदूच्या विकासातील दोषांमुळे होतो.  

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) हा याचा मुख्य प्रकार आहे.


पक्षाघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय: 

* रक्तदाब (BP) आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा. 

 

* तंबाखू आणि मद्यपान टाळा.


* नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या.


* मधुमेह आणि हृदयरोग असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.


*ताणतणाव कमी करा आणि पुरेशी झोप घ्या.


पक्षाघात झाल्यानंतर वैद्यकीय उपचार (Treatment of Paralysis): 

* थ्रोम्बोलायटिक औषधे (Blood Thinners) रक्तातील गुठळ्या विरघळवण्यासाठी दिली जातात.  

* रक्तदाब नियंत्रित करणारी औषधे.

* फिजिओथेरपी (Physiotherapy) पक्षाघातग्रस्त भागाला हळूहळू चालण्यास मदत करणे.  

* भाषा थेरपी (Speech Therapy) बोलण्यास त्रास होत असेल तर.  


अर्धांगवायुवर आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार

* अश्वगंधा आणि ब्राह्मी मेंदूच्या पेशींसाठी फायदेशीर आहेत त्यामुळे याचे सेवन चालू करावे. 


* तिळाचे तेलाने मालीश: पक्षाघातग्रस्त भागावर तेलाने मालीश केल्यास स्नायू सक्रिय होतात.  


* योग आणि प्राणायाम:  रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू बळकट होतात.  


जर कोणालाहीस्ट्रोकची प्राथमिक लक्षणे जाणवत असतील तर विलंब न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे.**  

पक्षाघात (Paralysis disease) आजाराची माहिती!


पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो आणि डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो व शरीर लुळे पडते.


*पक्षाघाताचे  प्रमुख प्रकार :

पक्षाघाताचे प्रामुख्याने दोन प्रमुख प्रकार असतात.

* Ischemic पक्षाघात: या प्रकारात मेंदुतील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते त्यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागास रक्ताचा पुरवठा बंद झाल्यामुळे पक्षाघात होतो.


* Hemorrhagic पक्षाघात: या प्रकारात मेंदुमधील रक्तवाहिन्या फुटून मेंदूत रक्तस्त्राव होऊन पक्षाघात होतो. पक्षाघाताचा झटका आल्यावर सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनद्वारे कोणता प्रकार आहे ते उपचार करण्यापूर्वी तपासले जाते.


 * Transient Ischemic Attack: म्हणजे TIA नावाचा एक तिसरा प्रकारही असतो. यामध्ये पक्षाघाताची लक्षणे 24 तासाच्या आत निघून जातात आणि रुग्ण पूर्ववत बरा होतो. मात्र TIA ही Warning असते. एकदा TIA येऊन गेल्यास योग्य उपचार न केल्यास आपणास पुढे पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तेंव्हा TIA येऊन गेल्याससुध्दा डॉक्टरांकडून निदान आणि उपचार करून घ्यावेत. त्यामुळे पक्षाघाताचा धोका टळण्यास मदत होईल


पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यासाठी ‘FAST’ टेस्ट करू शकतो.

* F:  Face (Facial Weakness): रुग्णास हसण्यास सांगा. हसताना एका बाजूचा चेहरा, ओठ आणि डोळे लटकलेले दिसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

पक्षाघात झाल्यास प्राथमिक निदान करताना हे तपासून पाहावे: 

* A: Arms (Arm Weakness):  रुग्णाला त्याचे दोन्ही हात पुढे व वर उचलण्यास सांगा. जर रुग्णाचा एक हात वर व समोर उचलता येत नसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

* S'  Speech Difficulty): रुग्णास प्रश्न विचारून तो व्यवस्थित बोलतो का ते पहा. जर त्याला बोलताना त्रास होत असल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.


* T:  Time (Time to Act): 

कोणतीही कृती करताना किंवा प्रतिक्रिया देताना सामान्य प्रतिक्रिया न आढळता त्यामध्ये विसंगती आढळते


वरील लक्षणे जर कमी प्रमाणात जाणवत असतील तर निगेटीव्ह आयनची टोपी मिळते ती वापरण्यास सुरुवात करावी व मेंदूचे रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी हर्बल ट्रीटमेंट घेणे उत्तम ज्यायोगे मेंदूचे रक्ताभिसरण (Brain Circulation) सुरळीत होऊ शकेल व संभाव्य धोका टळू शकेल. तसेच ही लक्षणे रुग्णामध्ये जास्त प्रमाणात दिसून आल्यास वेळ न दवडता रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. जवळ वाहतुकीचे साधन नसल्यास 108 या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घावी आणि रुग्णाला तातडीने उपचार चालू होतील याची दक्षता घ्यावी.


निष्कर्ष: पक्षाघात हा गंभीर आजार जरी असला तरी तत्काळ उपचार, संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि फिजिओथेरपीच्या मदतीने त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येते.


टिप्पण्या