आहार हेच एक औषध!

आहार हेच औषध आहे. आहाराच्या माध्यमातून अनेक आजार बरे होतात. आहार योग्य वेळी योग्य आणि योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपले पोषण करते. आयुर्वेदात आहाराचे काही नियम दिले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत जे आपण पाळले तर आपले शरीर निरोगी आणि पुष्ट राहील.  संतुलित आहार घेतल्याने आरोग्य चांगले राहते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. 
संतुलित आहार घेण्याचे फायदे: 
पचनास चालना मिळते
उर्जेची पातळी वाढण्यास मदत होते.
मानसिक आरोग्य सुधारते. 
वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टरॉल यांचा धोका कमी होतो
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि काही कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

संतुलित आहार घेण्यासाठी काय करावे?

* रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे. तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते , प्रतिकार शक्ती कायम ठेवते , तसेच ते एक उत्तम रसायनदेखील आहे . शक्यतो देशी गाईचे तूप हे उत्तम , मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूपदेखील उत्तम असते . 

* आपल्या पोटाचे चार भाग करावेत . त्यातील दोन भाग हे घन आहारासाठी ठेवावेत , एक भाग हा द्रव आहारासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा , जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो . आहार हा योग्य रीतीने पचला , तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहील.

* दैनंदिन आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, पाणी, जीवनसत्त्व व खनिज द्रव्ये यांचे योग्य प्रमाण असावे 

* कच्च्या पालेभाज्या व भारतीय पद्धतीच्या कोशिंबीरीचे वेगवेगळे प्रकार खावेत 
* सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे . लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त , तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो .

* जेवणाआधी आर्धा ते पाऊण तास एक ग्लास पाणी प्यावे. जेणेकरून आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.

* कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये . कारण असे केल्यास मळमळणे , वा छातीत जळजळणे सुरू होते , तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही. कारण दोहोंच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असतात.

* अतिशय घाईघाईने किंवा अतिशय हळू जेवू नये . पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडू शकतो.

* दुपारी जेवणानंतर लगेचच जास्त वेळ झोपू नये. असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते .

* सकाळचे व दुपारचे जेवण हे दोन घास जास्त असले तरी चालेल , मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे. रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसून येतात.
* आहार हा ताजा बनवलेला . फ्रिजमधील थंड नसावा . तसेच फ्रिजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते.
* पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही , म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये . असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांनादेखील कारणीभूत ठरू शकते. दोन जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर असावे.

* दुपारच्या जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे . त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि खाई खाई होत नाही . 

 * दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये . जसे फुट कस्टर्ड , शिकरण . असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोगनिर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते . कारण आयुर्वेदामध्ये हा विरुद्ध आहार मानला जातो.

* अतिकोरडे , अतितेलकट , अतिगरम , अतिशीत , अतिस्निग्ध असा आहार नसावा . सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते . आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला , तर 

* फळे, पाले भाज्या, पिष्टमय पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करावा.

* चरबी, मीठ किंवा साखर जास्त असलेले पदार्थ आणि पेये यांचे सेवन मर्यादित ठेवावे.

टिप्पण्या