- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्त्री किंवा पुरुषांनी अंघोळ झाल्यानंतर कपाळ मोकळे ठेवू नये असे आपले पूर्वज पूर्वीपासून म्हणत, त्याच्या पाठीमागे काय कारणे आहेत ते आपण या लेखात जाणून घेऊयात.
हिंदू संस्कृतीमध्ये गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण असते.
देह देवाचे मंदिर' असे आपण मानतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याप्रमाणे आपल्या देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. यकृत, मेंदू, हृदय, स्वादुपिंड, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असली, तरच आपला देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे आधार स्तंभ असतात.
मनुष्य देहामध्ये परमेश्वर नित्य वास करतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे, म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या कुणा संसारी माणसांना पूजेसाठी वेळ नसतो, त्यांनी कमीत कमी स्नान झाल्यावर आपल्या कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा करावी.
एक छोटा प्रसंग सांगतो. एका आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळ खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, 'तूम्ही कपाळावर ही विभूती का लावता? त्यावर प्रज्ञानंधा म्हणाले, माझी आई मला सांगते म्हणून!
गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे,गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात. गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते `माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते.
गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाजदेखील संस्कृतीरक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही, तर स्वत:च्या अस्तित्वाची स्वत:ला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदूधर्मा मध्ये आणि आर्यसंस्कृतीने तिलकविधीला स्थान दिले आहे.
अनादी काळापासून स्त्री-पुरुष कपाळावर गंध लावीत असत़ त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली आहे, परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणेदेखील आहेत ते खालीलप्रमाणे होत.
1) गंध केवळ सुगंधी म्हणून नाही, तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इ. विविध पदार्थांनी युक्त असते.
2) आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे, यासाठीदेखील गंध लावले जाते.
3) गंध लावताना अंगुलीस्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात.
4) गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो.
5) सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर, आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते आणि माझ्याकडे देव माझा पाहतो आहे' ही जाणीव या गंधाद्वारे सातत्याने आपल्याला होत राहते.
6) तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता, प्रेम इ. सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते असते.
तिलक आणि त्याचे महत्त्व:
कोणत्याही सुवासिनीनी हळद-कुंकाची लावलेली दोन बोटं त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवत असतात. भजणी मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी इत्यादी मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. तुम्ही ऐकले असेल इतिहासामध्ये लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यानंतर मधल्या करांगळीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जात असे. त्यालाच विजयतिलक म्हणत असत. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते.त्याचप्रमाणे नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांनादेखील गंध लावून पूजन केले जाते. बहीण आपल्या भावाला, पत्नी पतीला तसेच आई आपल्या मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank you to visit Healthmantra blog