- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गुडघेदुखी एक सामान्य समस्यांपैकी एक आहे जी बऱ्याच लोकांना सतावत असते. जास्तकरून ही समस्या वृद्धापकाळात त्रासदायक ठरते, यासाठी आपण या लेखामध्ये गुडघेदुखीवर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. गुडघ्याचा सांधा हा तुमच्या शरीरातील सर्वात मोठा सांधा आहे. तो तुमच्या मांडीचे हाड (फेमर) तुमच्या शिन हाड (टिबिया) शी जोडतो. ते तुम्हाला उभे राहण्यास, हालचाल करण्यास आणि तुमचा तोल राखण्यास मदत करते, म्हणून गुडघ्याचे सामान्य कार्य पुनर्संचयित करण्यासाठी नियमित व्यायाम करावा.
गुडघेदुखीवर घरगुती उपाय.
गुडघेदुखी कारणे:
* जुन्या झालेल्या दुखापती, ऑस्टियोआर्थरायटिस, मोच आणि इतर कारणांमुळे गुडघेदुखी लवकर उद्भवू शकते, त्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळा येऊ शकतो.
* संधिवात: ही एक स्वयंप्रतिकार स्थिती ज्याच्यामुळे गुडघ्यांसह सांध्यामध्ये जळजळ होते, ज्यामुळे वेदना, सूज आणि कडकपणा येत असतो.
* अस्थिबंधन दुखापत: गुडघ्याच्या अस्थिबंधनामध्ये ताण येणे किंवा अचानक वळणे ज्यामुळे वेदना, सूज आणि कडकपणा येतो.
* संधिरोग: गुडघ्याच्या सांध्यामध्ये यूरिक ऍसिड क्रिस्टल्स तयार होतात, ज्यामुळे अचानक आणि तीव्र वेदना, सूज आणि लालसरपणा दिसून येतो.
गुडघेदुखीवर उपाय:
* हळद: हळद ही एक शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट आहे जी गुडघेदुखी कमी करण्यास मदत करते. दाह कमी करण्यासाठी तुमच्या आहारात हळदीचा समावेश करा.
* उष्ण/उबदार पट्टी: रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि स्नायूंना आराम देण्यासाठी तुम्ही गुडघ्यावर हीटिंग पॅड किंवा उबदार टॉवेल लावू शकता. यामुळे कडकपणा कमी होतो आणि गतिशीलता वाढण्यास मदत होते.
* बर्फाचे पॅक: वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी बर्फाचे पॅक प्रभावी आहेत. सूज कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावित भागाभोवती बर्फाचे पॅक किंवा कोल्ड कॉम्प्रेस लावल्यास गुडघे दुखीवर आराम मिळतो.
* सफरचंदाचा व्हिनेगर वापरणे हे गुडघेदुखिवर फायदेशीर ठरते.
* तीळ तेल आणि लिंबाच्या रसाने वेदना होणाऱ्या भागावर लावणे.
* मसाज: लसूण आणि मोहरीच्या तेलाने मसाज करणे
* ओमेगा 3, फॅटी ऍसिड्स समृध्द असलेले पदार्थ खाणे.
* पारिजातक काढा पिणे: पारिजातक ज्याची सफेद रंगाची फुले रात्री उमलतात आणि सकाळी गळून जातात. अशा या झाडाची ५ ते ७ पाने वाटून बारीक करून बारीक पेस्ट तयार करावी आणि ती पेस्ट एक ग्लास पाण्यात उकळवा. त्यानंतर उकळून ते जेव्हा अर्धे राहील तेव्हा ते झाली उतरून परत कोमट करावे आणि हे दररोज रिकाम्या पोटी प्यावे. असे केल्यामुळे तुमच्या शरीरातील आणि गुडघ्यातील वेदना दूर होण्यास मदत होईल. परंतु या औषधा सोबत इतर कोणतेही औषध घेऊ नये. हा एक गुडघेदुखी वरील सर्वात प्रभावी उपचार मनाला जातो.
* हळद आणि दूध: एक ग्लास गरम दूधात अर्धा चमचा हळद मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे.
हळदीतील कर्क्युमिन हे सूज कमी करण्यास मदत करते.
* मेथीचे दाणे: एक चमचा मेथीचे दाणे रात्री भिजत ठेवा आणि सकाळी चावून चावून खाणे.
मेथीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.
* आल्याचा रस: आल्याचा रस आणि मध एकत्र करून दिवसातून १ ते २ वेळा घ्यावे.
* गाईच्या तुपाने मालिश करणे: कोमट गाईचे तूप गुडघ्यावर हलक्या हाताने मालिश केल्याने वेदना लवकर थांबतात. तसेच यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि वेदना कमी होतात.
* गुळ आणि तिळाचे सेवन: रोज सकाळी गुळ आणि तिळाचा लाडू खाल्ल्याने हाडे बळकट होतात कारण
यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते.
* एरंडेल तेल मालिश: एरंडेल (कास्टर) तेल गरम करून याने गुडघ्यावर मालिश करने. एरंडेल तेल हे सांध्यातील वेदना आणि सूज कमी करण्यास फायदेशीर आहे.
* कोमट पाण्याचा शेक: एक टॉवेल कोमट पाण्यात भिजवून त्याने गुडघ्याला शेक द्यावा. यामुळे स्नायू सैल होतात आणि वेदना कमी होतात.
* योग, व्यायाम, सुर्यनमस्कार, बैठका, आणि पाय ताणण्याचे व्यायाम केल्याने गुडघ्याची ताकद वाढते.
योगासने, भद्रासन सांधेदुखी साठी लाभदायक आहेत.
* कणहेर चे पाने उकळून त्यांनी बारीक पेस्ट बनवा आणि तिळाच्या तेलात मिक्स करून गुडघ्यावर मालिश करा. असे केल्यामुळे तुम्हाला वेदने पासून त्वरित सुटका मिळेल.
* रात्री 2 चमचे मेथी एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी रिकाम्या पोटी मेथी चावून खावी आणि त्याबरोबर मेथीचे पाणी ही प्यावे यामुळे तुम्हाला कधीच गुडघा दुखण्याचा त्रास होणार नाही.
* एक ग्लास दुधात 4-5 लसून टाकून चांगले उकळवा आणि कोमट झाल्यावर पिण्यामुळे गुदाघादुखी मध्ये आराम मिळतो.
* दररोज अर्धा कच्चा नारळ खाण्यामुळे म्हातारपणात सुध्दा कधी गुडघेदुखीचा त्रास होणार नाही.
* 3 ते 4 अक्रोड रोज रिकाम्या पोटी खाण्यामुळे तुमच्या गुडघ्यात कधी त्रास जाणवणार नाही.
* रोज रात्री झोपण्या अगोदर एक ग्लास दुधात हळद मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला हाडे दुखण्याच्या त्रासातून मुक्ती मिळेल.
* एका डाळीच्या आकारा एवढा चुना (जो आपण पान खाताना खातो) दही किंवा पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला हाडे दुखण्याचा त्रास कधी होणार नाही. चुन्याचे पाणी कधीही सरळ बसून प्यावे यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल. हे औषध फक्त 1 महिना पिण्यामुळे शरीरातील कोणत्याही हाडाचे दुखणेवर आराम मिळतो.
* हाडांच्या दुखण्या पासून वाचण्यासाठी आपल्या जेवणामध्ये 30 टक्के भाज्या आणि फळांचा समावेश करा. यामुळे कधीही हाडे दुखण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
* सफरचंद, मोसंबी, संत्रे, टरबूज, खरबूज, केळे आणि नारळ इत्यादी फळांचे सेवन दररोज कर
* दुध आणि दुधा पासून बनलेले पदार्थ भरपूर खावेत आणि कच्चे पनीर आपल्या भोजनात समाविष्ट करावे असे केल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी मध्ये आराम मिळेल.
* बाजरी, मका यांचे देखील सेवन करा. कारण यामध्ये ते सर्व पौष्टिक गोष्टी असतात जे हाडे आणि सांधेदुखी पासून मुक्ती देतात.
* जर थंडीमुळे तुमच्या घरातील वृद्ध लोकांचे गुडघे दुखत असतील तर राईच्या तेलात लसून आणि ओवा शिजवा आणि मंग हे तेल कोमट झाल्यावर गुडघ्यावर मालिश करा, यामुळे वेदना त्वरित कमी होईल.
वरील सर्व घरगुती उपाय आहेत. गुडघे जास्तच दुखत असतील तर, झीज झाली असेल तर तीन महिने हर्बल शास्त्रशुद्ध न्युट्रीशन थेरपी घेतल्यास १००% आराम मिळतो. त्यामुळे झालेली झीज भरुन येते.
निष्कर्ष: गुडघेदुखीवर घरगुती उपाय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank you to visit Healthmantra blog