दंतमंजन वापरण्याचे फायदे:
दंतमंजन वापरण्याचे काय फायदे होतात ते आपण ये लेखात पाहूया.
* दंतमंजन वापरण्याचे फायदे: दात चमकदार होतात,
* दात मजबूत आणि स्वच्छ होतात,
* पायरियासारख्या गंभीर समस्या होत नाहीत,
* पोटाचे आजार होत नाहीत.
* दंतमंजनामुळे लाळग्रंथीचे स्वास्थ्य सुरक्षित राहते आणि त्यातून निर्माण होणारा लाळ रसही योग्य स्वरूपात पाझरतो.
तोंडातील लाळेचे महत्त्व:
लाळ नैसर्गिक क्षारीय स्वरूपाची असते. लाळरस पचनास व रोगप्रतिकारशक्ती अबाधित राखण्यासाठी अतिशय आवश्यक घटक आहे.
तोंडातील लाळग्रंथी द्वारे सतत लाळ पाझरते. लाळ ग्रंथींचे स्वास्थ्य संतुलित असेल तर त्यातून स्रवणारी लाळ ही योग्य प्रमाणात पाझरते, म्हणून आपण दिवसातून कमीत कमी एकदा दंतमंजन केलेच पाहिजे.
दंतमंजन कसे वापरावे:
* दंतमंजनासाठी आपल्या बोटांचा वापर करावा . अंगठ्याच्या बाजूचे बोट (तर्जनी ) सोडून इतर कोणतेही बोट दंतमंजन साठी वापरू शकतो. तर्जनीमुळे दात व हिरड्यांवर जास्त जोर पडतो आणि त्यामुळे दाब जास्त पडल्याने ईजा सुधा होऊ शकते.
दात पिवळे झाल्यास व दात चमकवण्यासाठी घरीच आपण दंतमंजन बनवू शकतो आणि वापरू शकतो.
दंतमंजन बनवण्यासाठी वड, विजयसार, अर्क, खैर, करंज, जाई, करवीर, अर्जुन, निंब यापैकी एक किंवा अनेक वनस्पतींचा उपयोग केला जातो.
दात स्वच्छ ठेवणे महत्वाचे:
दातांची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यास पायरियासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच तोंडातील लाळग्रंथी द्वारे सतत लाळ पाझरत असते. लाळ ग्रंथींचे स्वास्थ्य संतुलित असेल तर त्यातून स्रवणारी लाळ ही योग्य प्रमाणात पाझरते. लाळ नैसर्गिक क्षारीय स्वरूपाची असते. दंतमंजनामुळे लाळग्रंथीचे स्वास्थ्य सुरक्षित राहते आणि त्यातून निर्माण होणारा लाळ रसही योग्य स्वरूपात पाझरतो. लाळरस पचनास व रोगप्रतिकारशक्ती अबाधित राखण्यासाठी अतिशय आवश्यक घटक आहे.
* हिरड्यांना मसाज केल्यामुळे हिरड्या मजबूत होतात. हिरड्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हिरड्यांचे काही आजार असतील तर ते दंतमंजनामुळे बरे होण्यास मदत होते.
* दातांवरील सुरक्षाकवचही सुरक्षित राहून दातांची स्वच्छता राखली जाते.
*दंतमंजनात कोणत्या औषधींचा समावेश होतो?*
दंतमंजन किंचित तुरट, किंचित तिखट , किंचित कडू चवीचे असावे. त्यानुसार त्यामध्ये वनस्पतींचा समावेश करतात. जसे *कडुनिंब, लवंग, त्रिफळा चूर्ण, भीमसेनी कापूर, सैंधव, तुरटी , हळद इ.*
त्रिफळा चूर्णामध्ये किंचित सैंधव मिसळूनही वापरू शकतो.
* दातून म्हणजेच वनस्पतींच्या काडीचा ब्रश तयार करून वापरावा. जसे बब्बूल, कडुनिंब, आंबा, वड , खदिर इत्यादी.
* दंतमंजन गोड, खारट, आंबट चवीचे जास्त नसावे.
* बाजारात दंतमंजन सहज उपलब्ध आहेत जसे विको, बबुल ,सनातनचे दंतमंजन, इ. अनेक पर्याय आहेत.
* पूर्वीच्या काळी भारतात देशी गायी घरोघरी होत्या. गाईची शेणी जाळून त्या राखेमध्येच थोडे सैंधव मिसळून दात घासले जात असत, आज अनेक गोशाळा गाईच्या शेणाच्या राखेपासून दंतमंजन तयार करत आहेत. ते आपण सहजा सहजी मिळवू शकतो.
* आपण ज्या भागात राहतो त्या भागातील तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे सैंधव व हळद मिसळून हिरड्यांना मसाज करावा तयामुळे हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.अशा रितीने लहानपणापासूनच मुलांना दंतमंजन पावडरचीच सवय लावणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच अगदी सोपेही आहे. दंतमंजन पावडर मूलांनी गिळली तरी कोणताही अपाय नाही. औषधी वनस्पतीच पोटात जातील. तोंडातील लाळग्रंथी, दात, हिरड्या ह्यांचे स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्यात दंतमंजनाइतका सुरक्षित दुसरा कोणताही पर्याय नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank you to visit Healthmantra blog