रोजी
आयुर्वेद
आरोग्य
आहार हेच औषध
उपचार
योगा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पिंपळ हे एक केवळ झाड नसून औषध, ऊर्जा आणि पर्यावरणस्नेही वृक्ष आहे. आयुर्वेद आणि भारतीय परंपरेनुसार, हे झाड आरोग्य, आध्यात्मिक उन्नती आणि निसर्ग संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.पिंपळाच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. म्हणूनच पिंपळाचे औषधी गुणधर्म आणि उपचार यांचा प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये उल्लेख केला जातो.
या झाडाच्या पानांपासून ते फळे आणि मुळांपर्यंत सर्व भाग फायदेशीर आहेत. पिंपळ हे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड आहे. त्यात प्रथिने, चरबी, कॅल्शियम, लोह आणि मॅंगनीज यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात.
पिंपळ हे भारतीय संस्कृतीत आणि आयुर्वेदात अत्यंत पूजनीय व औषधी गुणधर्मांनी समृद्ध असा वृक्ष आहे. याला अश्वत्थ म्हणूनही ओळखला जाणारा हा वृक्ष शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असा आहे. आयुर्वेदानुसार पिंपळाच्या झाडाची पाने, फळे, मुले, साल यापासून अनेक आजारांवर उपचार करता येतात. या झाडामध्ये असलेले गुणधर्म श्वास, दातदुखी, सर्दी, खाज आणि नाकातून रक्त येणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.
पिंपळाला पर्यावरण समतोल राखणारा वृक्ष असेही म्हटले जाते कारण पिंपळाचा वृक्ष २४ तास ऑक्सिजन सोडतो, त्यामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.
हवेतील विषारी घटक शोषून हवा शुद्ध करणारा हा वृक्ष आहे.
पिंपळाचे आयुर्वेदातील औषधी गुणधर्म:
पिंपळाची पानं, साल, मुळं, फळं आणि बिया यांचा उपयोग विविध आजारांवर केला जातो.
* श्वसनाच्या समस्यांवर आराम मिळतो, श्वसनाच्या रुग्णांसाठी पिंपळ फायदेशीर आहे. फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी पिंपळाच्या सालीची पावडर वापरली जाते. पिपळाच्या सालीचे चूर्ण सुकल्यानंतर त्याची पावडर करून घेतल्यास श्वसनाच्या सर्व समस्यांवर आराम मिळतो.
* दातांसाठी पिंपळ काडीचा वापर: पिंपळ दातांसाठी फायदेशीर आहे. पिंपळाच्या काड्यांमध्ये असलेले गुणधर्म दातांसाठी फायदेशीर असतात. पिंपळाच्या काडीने दात घासल्याने दातांच्या समस्यांपासून सुटका मिळते त्यामुळे दातदुखीचा त्रास दूर होतो.
* त्वचेवर खाज सुटणे: पिंपळमध्ये असलेले गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर आहेत. पिपळाच्या पानांचा रस तयार करून प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायल्याने त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतात.
पिंपळाच्या पानांचे फायदे:
* अस्थमा आणि खोकला यावर उपचार करण्यासाठी पिंपळाची पाने औषध म्हणून आयुर्वेदामध्ये वापरली जातात. यासाठी २-३ कोवळी पिंपळाची पाने गायीच्या तुपात परतून खाल्ल्यास दमा आणि खोकल्यावर उपयोग होतो.
* पायांना भेगा पडल्या असतील तर पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या भागावर लावणे लाभदायी ठरते.
* पिंपळाच्या पानांचा रस मधासोबत घेतल्यास सर्दी-पडसे बरे होते.
* पिंपळाची पाने आतड्यांमध्ये आणि पोटात जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे रक्ताचे विकार बरे होतात.
* पिंपळाच्या पानांचा अर्क सेवन केल्याने आतड्यांसंबंधी संसर्ग बरा होतो. यामुळे गॅस, आम्लता आणि अपचन यासारख्या पचन समस्या दूर होतात.
* हृदयविकारमध्ये पिंपळाच्या पानांचा काढा प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय मजबूत होते.
पिंपळाची साल आणि मूळाचे फायदे:
* संक्रमण आणि जखम भरून काढण्यासाठी वापरली जाते.
* पीपळाच्या सालीचा लेप लावल्याने जखमा लवकर भरून येतात.
* मूळव्याध: पीपळाच्या सालीचा काढा प्यायल्याने मूळव्याधीच्या त्रासात आराम मिळतो.
पिंपळाच्या फळांचे फायदे:
* पचनक्रिया सुधारण्यासाठी पिंपळाची फळे वापरली जातात.
* 1 ते 2 ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते.
* पिंपळाची 3 ते 4 फळे रोज खाल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.
* पिंपळाच्या फळांचा चूर्ण घेतल्याने अपचन आणि गॅसच्या तक्रारी दूर होतात.
* शक्तिवर्धक: पिंपळाच्या कोवळ्या फळांचा रस शरीराला ताकद देतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
* पिंपळाच्या फळांचे चूर्ण घेतल्याने अपचन, गॅस, आणि आम्लपित्त दूर होते.
शक्तिवर्धक:
पिंपळाच्या मुळांचे फायदे:
* त्वचाविकार: पिंपळाच्या मुळांचा लेप लावल्याने खाज, पुरळ आणि त्वचेच्या संसर्गांपासून आराम मिळतो.
* मूत्रविकार: पिंपळाच्या मुळांचा काढा मूत्राशयाच्या समस्यांसाठी उपचार म्हणून केला जातो.
पिंपळाचे मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने खालीलप्रमाणे महत्व आहे.
पिंपळाच्या झाडाखाली मेडिटेशन (ध्यान) केल्याने मन शांत होते. तसेच याच्या सान्निध्यात प्राणवायू मोठ्या प्रमाणात मिळतो, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भगवान बुद्धांनी पिंपळाच्या झाडाखालीच ज्ञानप्राप्ती केली होती म्हणून याला बोधी वृक्ष असेही म्हटले जाते.
निष्कर्ष: पिंपळाचे औषधी गुणधर्म आणि उपचार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank you to visit Healthmantra blog