रक्त (हिमोग्लोबिन) वाढीसाठी उपाय:!


हिमोग्लोबिन हा रक्तातील एक अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो लोह (आयर्न) आणि प्रथिने (प्रोटीन) यापासून बनलेला असतो. आम्ही काही रक्त (हिमोग्लोबिन) वाढीसाठी उपाय सांगितले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही जर उपाय केले तर निश्चितच शरीरातील रक्त वाढीसाठी लाभदायक ठरेल. (हिमोग्लोबिन) हे तांबड्या पेशींमधील प्रोटीन Molecule असून ते फुफ्फुसांकडून ऑक्सिजन शरीरातील पेशींना पुरवण्याचे आणि  पेशींमधून कार्बनडॉय ऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांकडे पोहचवण्याचे महत्वत्वपुर्ण कार्य करत असतात. अन्नातील काही पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण शक्यतो कमी होत जाते.

रक्त (हिमोग्लोबिन) वाढीसाठी उपाय


रक्त (हिमोग्लोबिन) वाढीसाठी उपाय: 

शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर जास्त कमी असेल तर किडनी रोग, रक्ताची कमतरता, कँसर, पक्षाघात यासारखे आजार होऊ शकता. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, सुस्ती येणे अशा समस्या येऊ निर्माण होतात. रक्त चाचणीद्वारे (ब्लड टेस्ट) हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते. 15 ते 20 मिनिटांच्या आतच HB Test पूर्ण होते. हिमोग्लोबिन प्रमाण कमी झाल्यास रक्तातील ऑक्सीजनच्या वहनाची क्षमता कमी होते. ज्यामुळे लाल रक्त कणिकांची रक्तातील लाल पेशींची संख्या कमी होते आणि यामुळे अनीमिया आजार होण्याची शक्यता बळावते.

खालील काही कारणांमुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते: 

* अयोग्य आहाराच्या सेवनामुळे, 
* पोषणतत्वांच्या कमतरतेमुळे मुख्यतः आहारातील  लोह, B12 जीवनसत्व, फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
* गर्भधारणा: गर्भवती महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण वाढते, त्यामुळे शरीराला अधिक लोह, बी12 आणि फॉलिक अॅसिडची गरज असते. जर ही पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळाली नाहीत, तर हिमोग्लोबिनची पातळी हळू हळू कमी होऊ शकते. 
* काही औषधांचे दुष्परिणाम: काही औषधे लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे अशक्तपणा होऊ शकतो. 
* पोषक तत्त्वांची कमतरता: लोह, व्हिटॅमिन बी12 किंवा फोलेट सारख्या आवश्यक पोषक तत्त्वांचे अपुरे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते. 
* स्वयंप्रतिकार विकार (Autoimmune Disorders): संधिवात आणि ल्युपस सारख्या स्वयंप्रतिकार रोगांमुळे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी लाल रक्तपेशींवर मारा केल्यामुळे अनेमिया होऊ शकतो.
* अति प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने. उदा. शस्त्रक्रियेवेळी रक्तस्त्राव होणे, अपघातामुळे किंवा, मुळव्याध किंवा मलाशयाचा कैन्सर, पोटाचा कैन्सर या विकारात रक्तस्त्राव झाल्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन कमी होते.
* किडन्यांचे आजार झाल्यामुळे तसेच किडन्या निकामी झाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत जाते.


रक्त (हिमोग्लोबिन) वाढीसाठी उपाय


हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी घरगुती उपाय: 

* बीट, काळ्या मनुका, खजूर, आंबा, पेरू, सफरचंद या फळांचा आहारामध्ये समावेश करावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. हे रक्तातील हीमोग्लोबीनची वाढ करते आणि लाल रक्तकणांच्या सक्रियतेला मदत करते.
* लोहयुक्त आहाराचा समावेश करणे: लोहाच्या समृद्ध स्त्रोतांचा आहारात समावेश केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.
*पालेभाज्या: पालक, केळ, ब्रोकोली आणि मोहरीच्या पानांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. 
* डाळी आणि कडधान्ये: डाळ, मसूर, चणे आणि शेंगदाणे यांसारख्या कडधान्यांमध्ये लोह व प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. 
* बीट: बीटामध्ये लोह, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होत जाते.
* व्हिटॅमिन सी चे सेवन वाढवणे: व्हिटॅमिन सी लोहाच्या शोषणात मदत करते. संत्रे, लिंबू, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली आणि भोपळी मिरची यांसारख्या फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश केल्याने झटपट हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
* फोलेट आणि व्हिटॅमिन बी12 समृद्ध अन्नाचे सेवन: फोलेट आणि व्हिटॅमिन बी12 लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत. पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ आणि सीफूड यांचा आहारात समावेश करा. 
* मनुके आणि खजूर: मनुके आणि खजूर हे लोहाचे चांगले स्रोत आहेत. 

रक्त (हिमोग्लोबिन) वाढीसाठी उपाय



* रात्रभर पाण्यात भिजवलेले मनुके सकाळी खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. 
* तिळाचे सेवन करणे: तिळामध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अशक्तपणा दूर होऊ होतो. * रात्रभर पाण्यात भिजवलेले तीळ सकाळी अनुषापोटी  घेतल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. 
* तांब्याच्या भांड्यातील पाणी:  तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.
* हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाल्या पाहिजेत. 
* शेंगदाणे, गुळ, दूध, तीळ, पालक व दुधाचे पदार्थ, अंडी, नारळ, मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा. 


निष्कर्ष: रक्त (हिमोग्लोबिन) वाढीसाठी उपाय.



टिप्पण्या