- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अॅसिडिटी: लक्षणे ,कारणे आणि उपाय:
अन्ननलिकेत जास्त आम्ल तयार झाल्यामुळे ऍसिडिटी होते. याला आम्लपित्त म्हणूनही ओळखले जाते तसेच खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे डायजेशन प्रक्रियेमध्ये पोटात एक असे अॅसिड स्रावीत होते जे डायजेशनसाठी खूप आवश्यक असते. अनेकदा हे अॅसिड गरजेपेक्षा जास्त निर्माण होऊ लागते ज्यामुळे हृदयात जळजळ आणि पोटात गरम होते. या स्थितीला अॅसिडिटी किंवा अॅसिड पेप्टिक रोगाच्या नावाने ओळखले जाते.
अॅसिडिटी: लक्षणे ,कारणे आणि उपाय:
ऍसिडिटीची होण्याची कारणे:
* जास्त ताण आणि अपुरी झोप.
* मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे
* धूम्रपान आणि मद्यपान
* पोटाचे आजार जसे की पेप्टिक अल्सर,
* गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग, पोटातील गाठी
नॉन-स्टिरॉइडल
* अँटी-इंफ्लेमेटरी औषधे सारखी औषधे जास्त घेणे.
* कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेये जास्त पिणे
* चॉकलेट्स , केक्स आणि पेपरमिंटचे सेवन
जास्त प्रमाणात कारणे
*चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैली.
आहारात अनियमितपणा, अन्न व्यवस्थितपणे न चावणे, पर्याप्त प्रमाणात पाणी न पिणे, तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे, जंक फूड, तणावग्रस्त राहणे आणि धुम्रपान इ. गोष्टी अॅसिडिटीला कारणीभूत ठरतात. जड अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने अॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. सकाळी नाष्टा न करणे आणि उशिरापर्यंत उपाशी राहिल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
अॅसिडिटीची लक्षणे:
* पोट गरम झाल्याचे जाणवणे.
* हृदयात जळजळ.
* मळमळ होणे.
* ढेकर येणे.
* अन्न-पाणी घेण्याची इच्छा न होणे.
* डिस्पेप्सिया.
ॲसिडिटी कमी करण्यासाठी उपाय:
ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी काही फळांचे सेवन करणे हा रामबाण उपाय आहे, याने ॲसिडिटी कमी होऊन त्यापासून होणारे गंभीर आजार रोखण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी : बेरीसारख्या फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण कमी आणि अँटिऑक्सिडंट जास्त असतात. त्यामुळे ही फळे पचायला चांगली असतात. चेरी : लालभडक चेरीमध्ये मेलाटोनिन असते जे झोप सुधारण्यास मदत करू शकते
पपई:
हे एक चवदार, गोड आणि आरोग्यदायी फळ आहे. पपईत बीटा-कॅरोटिन, ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, प्रोटीन आदी तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पपई खाल्याने पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते.
बटाटा:
बटाटा हेसुद्धा एक प्रकारचे ॲसिडिटी दूर करण्याचे कार्य करते. कदाचित तुम्हाला गॅस, अॅसिडिटी दूर करण्याचा हा विचित्र उपाय वाटेल, परंतु बटाट्याचे ज्यूस अॅसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत करते. बटाटा एल्कलाइनचा उत्तम स्रोत आहे. ज्यूस तयार करण्यासाठी कच्चे बटाटे साल काढून पाणी मिसळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर या ज्यूसमध्ये थोडेसे गरम पाणी मिसळून हे ज्यूस घ्या, याने अॅसिडिटी दूर होईल तसेच लिव्हर सुद्धा स्वच्छ होईल.
जांभूळ:
मधुमेह उपचारामध्ये जांभूळ एक पारंपारिक औषध म्हणून वापरले जाते. या फळाला मधुमेह रुग्णांचेच फळ म्हटले तर अतिशोक्ती ठरणार नाही, कारण यातील बी, साल, रस आणि गर हे सर्व घटक मधुमेहमध्ये सर्वात फायदेशीर आहेत. ऋतूनुसार जांभळाचे सेवन औषधी रुपात भरपूर करावे. पोटाच्या रोगावर हे रामबाण औषध आहे. रिकाम्या पोटी जांभूळ खाल्ल्यास गॅस व अॅसिडिटीची समस्या दूर होते.
पेरू:
पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीमध्ये फायदा होतो. पेरूमध्ये विविध प्रकारचे गुण असतात, जे आरोग्यासाठी लाभकारी ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन, फायबर आणि मिनरल तत्व भरपूर प्रमाणत असतात. यामध्ये फायबर असल्यामुळे हे बद्धकोष्ठता दूर करते.
केळी:
सकाळी उठताच पोटात जडपणा, जळजळ किंवा आंबट ढेकर येण्यास सुरुवात होते. तज्ज्ञांच्या मते अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रिकाम्या पोटी केळी खाणे खूप फायदेशीर आहे. केळी पचनक्रियेसाठी खूप चांगली असून सहज पचते. यामुळे अॅसिडचा प्रभाव कमी होतो. केळीमध्ये पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळतात
संत्री:
संत्री हे ॲसिडिटी दूर करण्यासाठी रामबाण फळ आहे, संत्र्याची विशेषता म्हणजे याच्यामध्ये उपलब्ध असलेले खनिज, फ्रक्टोज, डेक्स्ट्रोज आणि व्हिटॅमिन्स शरीरात पोहोचल्यानंतर उर्जा निर्माण करण्याचे कार्य करत असतात. संत्रीचे सेवन केल्याने शरीर स्वस्थ राहते आणि उत्साह वाढतो. याच्या नियमित सेवनाने अॅसिडिटी नष्ट होत असते.
हिरव्या पालेभाज्या: नियमित हिरव्या पालेभज्या खाणे हे होणाऱ्या सर्व आजारावरील औषध आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank you to visit Healthmantra blog