तळ पायांवरील भेगा दूर करण्याचे घरगुती उपाय

तळ पायांवरील भेगा दूर करण्याचे घरगुती उपाय

तळ पायांवर सतत पडणाऱ्या भेगा हे बऱ्याच लोकांच्या तक्रारींचे कारण असते. परंतु थोडी अधिक काळजी घेतली तर पायावरील भेगांपासून आपल्याला सुटका मिळू शकते.

मुख्यतः अनेक स्त्रियांना ही समस्या असते. यामागे वातावरण, धूळ, बदलते हवामान अशी कारणे असतात. मात्र, याहून अधिक आपल्या शरीराची प्रकृती, वजन आणि एकंदरीत आपली तब्येत कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.  
भेगा घालवण्याचे उपाय: 

*शरीरातील उष्णता हे एक मुख्य कारण पायांवरील भेगांचे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकृतीने थंड असलेले पदार्थ खाऊन शरीराची उष्णता आपण कमी करू शकतो.

*सोडा आणि दुधाने पायांवर मसाज केल्याने पायांवरील Dead skin निघून जातात.

*आठवड्यातून 2 ते 3 वेळा कोमट पाण्यात खडे मीठ टाकून 15 ते 20 मिनिटे पाय पाण्यात ठेवावे नंतर तेल किंवा क्रीम लावून मसाज करावा आणि नंतर मोजे घालावेत, रात्री झोपताना असे केल्यास दिवसभर पडलेल्या ताणामुळे झालेला थकवा पण दूर होतो .

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Thank you to visit Healthmantra blog