आयुर्वेदामध्ये पंचकर्म आणि उपचार पद्धती!
पंचकर्म उपचार हा एक समग्र आणि परिवर्तनकारी उपचारात्मक दृष्टिकोन आहे जो पारंपारिक आयुर्वेदिक औषधांचा एक आवश्यक भाग आहे. शरीराचे नैसर्गिक संतुलन पुनर्संचयित करणे, विषारी पदार्थ काढून टाकणे आणि मन, शरीर आणि आत्मा यांना पुनरुज्जीवित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. "पंचकर्म" या शब्दात दोन शब्द आहेत: "पंच" (म्हणजे पाच) आणि "कर्म" (म्हणजे कृती). नावाप्रमाणेच, पंचकर्मामध्ये शरीराच्या दोषांना (वात, पित्त आणि कफ) विषमुक्त करण्यासाठी तयार केले आयुर्वेदिक उपचार पद्धती होय.
आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रामुख्याने शमन आणि शोधन अशी वर्गीकृत केली जाते. वाढलेले दोष स्वस्थानी नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेस शमन असे म्हणतात. तर वाढलेले दोष स्वस्थानातून खेचून बाहेर काढून शरीराबाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस शोधन असे म्हणतात. पंचकर्मे ही शोधन प्रक्रियेचा भाग मानली जातात. म्हणूनच पंचाकर्मांना 'शोधन कर्मे' असेदेखील म्हणले जाते.
पंचकर्मे:
पंचकर्मे ही शोधन कर्मे आहेत. ती संख्येने पाच आहेत म्हणून त्यास पंचकर्मे असे म्हणले जाते.
1) वमन
2) विरेचन
3) बस्ती
4) नस्य
5) रक्तमोक्षण
ही पाच कर्मे पंचकर्मे म्हणून ओळखली जातात.
पंचकर्म ही एक आयुर्वेद उपचार पद्धती आहे आणि
याचे विश्लेषण पुढील प्रमाणे केले ग्रंथामध्ये केलेले आहे.
१ ) वमन
शरीरातील वाढलेले दोष मुखावाटे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस वमन असे म्हणतात. वमन ही कफ दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.
२) विरेचन
शरीरातील वाढलेले दोष अधोमार्गाने बाहेर काढण्याच्या प्रक्रियेस विरेचन असे म्हणतात. विरेचन ही पित्त दोषासाठी प्रधान चिकित्सा मानली जाते.
३) बस्ती
शरीरातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी गुदद्वारामार्गे औषधी देण्याच्या प्रक्रियेस बस्ती असे म्हणले जाते. बस्ती ही वात दोषाची प्रमुख चिकित्सा मानले जाते.
४) नस्य
मानेच्या वरील प्रदेशातील दोषांचे निर्हरण करण्यासाठी नाकाद्वारे औषध देण्याच्या प्रक्रियेस नस्य असे म्हणतात.
५) रक्तमोक्षण
अशुद्ध रक्त शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेस रक्तमोक्षण असे म्हणतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank you to visit Healthmantra blog