रिफाईंड ऑइल खायला हानिकारक आहे, मग कुठलं तेल खाण्यात वापरायचे आणि तेच का खायचं ?
कोल्ड कम्प्रेस् ऑइल म्हणजेच लाकडी घाण्याचे तेल. जुन्या पद्धतीत तेल काढण्याची पद्धत म्हणजे लकडी घान्यावरील तेल…
लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे:
१. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते .
२. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात . तो सुगंध त्या प्रोटिन्सचाच असतो .
३. शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स सुद्धा असतात .
४. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही . शिवाय हा घाणा एक मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो . थोडक्यात या लाकडी घाण्याचा RPM १४ असतो . त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही .
५. शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H.D.L) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो . म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक असावे .
६. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही .
७. हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस,ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे .
८. भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते . १०० वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.
९. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ सेल्सिअसपेक्षा जास्त नसते त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही . हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात .
१०. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे, आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवणारे लाकडी घाण्याचेच शुद्ध तेल खावे . तसंच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे की, शेंगदाण्याच्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते हे चुकीचे आहे . उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे H. D. L. वाढते आणि हेच H. D. L. आपल्या शरीरात अत्यंत आवश्यक असते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank you to visit Healthmantra blog