रोजी
आयुर्वेद
आरोग्य
आहार हेच औषध
उपचार
योगा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हळद ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हळदीमधील अँटिऑक्सिडंट घटक शरीरातील सूज जाण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास आणि पाचन शक्ती वाढवण्यास मदत होते तसेच पोट साफ होऊन पित्ताचे प्रमाण समतोल राहते. चला तर आपण आज जाणून घेऊया हळदीचे आरोग्यदायी फायदे.
हळद ही आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची औषधी वनस्पती आहे, हळदीचा वापर त्वचेला चमक देणारा नैसर्गिक त्वचा स्वच्छ करणारा म्हणून बऱ्याच काळापासून केला जात आहे. लग्नापूर्वी धार्मिक समारंभात वधू आणि वराला त्यांच्या त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे सोरायसिस, मुरुमे, एक्झिमा आणि फोटोजिंगसारख्या त्वचेच्या विविध समस्यां कमी करण्यास मदत होते. कारण यामधील आयुर्वेदिक घटक, विटामिन A,C, B1 आणि B2, B12 आणि B3 फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, लोह कॅल्शियम, पोटॅशियम असते, ज्यामुळे अपचन, ऍसिडिटी, मूळव्याध, मधुमेह आणि पित्त जाण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते असते..
हळदीचे गुणधर्म:
* शरीरातील जळजळ कमी करणे
* रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
* पचनक्रिया मजबूत करणे
* पचनास मदत: पारंपारिक औषधांमध्ये, हळदीचा वापर पचनास मदत करण्यासाठी आणि पचन विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
* पित्त उत्पादनास उत्तेजन देते, जे चरबी पचनास मदत करते आणि अपचन आणि पोटफुगीची लक्षणे कमी करू शकते.
* सांधे आरोग्य: त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, हळद सांधेदुखी आणि संधिवातशी संबंधित कडकपणा कमी करण्यास मदत करू शकते.
* सांधे झीज होण्याची प्रक्रिया मंद करणे.
* मुरुम आणि मुरुमांसारख्या समस्या कमी करणे
* शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे
* रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे
* सर्दी, पडसे, खोकला आणि ताप रोखणे
* सांधेदुखी कमी करणे
* दाहक-विरोधी गुणधर्म: हळदीतील सक्रिय संयुग, कर्क्यूमिन, एक शक्तिशाली दाहक-विरोधी घटक आहे. ते शरीरातील दाह कमी करण्यास मदत करते.
हळदीचा औषध म्हणून वापर कसा करावा:
* हळदीचे पाणी प्यायल्याने त्वचेचा टोन सुधारतो आणि मुरुम आणि मुरुमांसारख्या समस्याही कमी होतात.
* हळद दुधात घालून प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
* खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून दुधामध्ये हळद टाकून पिणे.
घरातील चिमूटभर हळद ही शरीरातील वाढलेली उष्णता तसेच मूळव्याधीचा त्रास ही दूर करते. भयंकर मूळव्याधाचा त्रास असेल, त्यामध्ये रक्त पडणे, कोंब, पोटात आग होणे, आग-आग होणे असे आठवड्यातून, महिन्यातून काही वेळेस किंवा रोजच हा त्रास होत असेल तर हा त्रास हळदीचा योग्य प्रमाणात वापर करून कमी केला जाऊ शकतो.
याशिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर, दंड, मांड्या, नितंब यावर चिवट चरबी जमा झाली असेल, तर ती कमी करण्यासाठी आणि बिघडलेली पाचनशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी हा उपाय ठरणार आहे.
ज्यांचे पोट साफ होत नाही, वारंवार पित्त होत असेल किंवा नेहमी सकाळी उठताच मळमळ, तोंडाला पाणी येत असेल किंवा पित्ताची नियमित गोळी घ्यावी लागत असेल, तर अशा व्यक्तींना हळदीचा औषधी म्हणून वापर करणे हे फायदेशीर ठरते.
सर्वप्रथम कोरफडीचे पाने व्यवस्थीत स्वछ करून घ्यावीत, मग चाकूच्या साहाय्याने या पानांच्या वरचे आवरण काढून घ्यावे. त्यानंतर चमच्याच्या मदतीने हळुवारपणे कोरफडीचा गर काढून घ्यावा, हा रस किंवा गर 10 मिली घ्यावा त्यानंतर हळद साधारण 10 ग्रॅम लागणार आहे. हळद सर्वप्रथम आपणास तव्यावर भाजून घ्यायची आहे आणि ही भाजत असताना मंद आचेवर चांगली भाजून घ्यायची आहे. आता ही भाजलेली हळद आणि कोरफडीचा गर चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यावा, हे मिक्स केलेले तयार होणारे औषध हे सकाळी उठल्यानंतर अनुशापोटी घ्यावे.
हा उपाय सलग 3 दिवस करावा , याने खात्रिशिरपणे मूळव्याधीचा त्रास कमी होईल. तसेच हा उपाय जर सलग एक महिना केला, तर कोणत्याही प्रकारचा मूळव्याधाचा त्रास कायमचा नष्ट होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते.
याचप्रमाणे जास्त हळदीचे सेवन करण्याचे नकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येतात.
जास्त हळद सेवन केल्याने पोटाच्या समस्या वाढू शकतात जसे की ऍसिड रिफ्लक्स आणि पित्त खडे.
हळद लोहाचे शोषण मर्यादित करत असल्याने, जर तुम्ही लोह पूरक आहार घेत असाल तर तुम्ही ते घेऊ नये. असा आयुर्वेदामध्ये सल्ला दिला गेला आहे.
निष्कर्ष: हळदीचे आरोग्यदायी फायदे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank you to visit Healthmantra blog